आमचे कार्य

Our Work

A glimpse of the activities and seva carried out by Sahayog Samarpan Seva Foundation — serving the community, one initiative at a time.

Maharashtra Day Initiative at Anam Prem
1 May 2026

Maharashtra Day Initiative at Anam Prem

महाराष्ट्र दिन उपक्रम

Anam Prem, Ahilyanagar

आज महाराष्ट्र दिन या निमित्ताने सहायोग समर्पण सेवा फाउंडेशन तर्फे अनाम प्रेम संस्था ( अंध व अपंग मुलांसाठी कार्यरत असलेली संस्था ) यांना भेट देऊन, त्यांना किराणा व जीवनावश्यक वस्तू पुरवण्याची सेवा करण्याची संधी मिळाली.

गौरवशाली महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनी, सामाजिक सेवेद्वारे मानवी हितासाठी हातभार लावता आला ही ईश्वर कृपा. 🙏

आपल्या सर्वांच्या पाठिंब्यामुळेच हे सेवाकार्य ह्याच जोमाने पुढे चालू राहील अशी ईश्वर चरणी प्रार्थना. 🙏

!! सेवा हेच कर्म !!

Diwali Celebration 2025 at Anam Prem
20 October 2025

Diwali Celebration 2025 at Anam Prem

दिवाळी उपक्रम 2025 – दुसरा

Anam Prem, Nimblak, Ahilyanagar

या वर्षी आमच्या सहायोग समर्पण ग्रुपला १० वर्षे पूर्ण झाली असून, या दशकपूर्तीच्या निमित्ताने दिवाळी साजरी करण्यासाठी एक विशेष सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.

दिवाळी निमित्त आम्ही आज अनाप्रेम संस्था, निंबळक, अहिल्यानगर येथे भेट दिली. ही संस्था दिव्यांग मुलांसाठी कार्यरत असून, त्यांना शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी अखंड प्रयत्नशील आहे.

या भेटीदरम्यान तेथील विद्यार्थ्यांसाठी धान्य, किराणा सामान, तसेच दैनंदिन वापरातील वस्तू भेट स्वरूपात देण्यात आल्या. यामुळे दिवाळीचा खरा आनंद आम्हा सर्वांसाठी दुगुणित झाला.

तसेच संस्थेमध्ये राबविण्यात येणारे अनेक उपक्रम — Bouquets बनवणे, चप्पल बनवणे, गोशाळा, तसेच स्क्रॅप वस्तूंपासून “टाकाऊ ते टिकाऊ” या संकल्पनेवर आधारित प्रकल्प — हे प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली.

आजचा हा अनुभव अत्यंत अभूतपूर्व, प्रेरणादायी आणि हर्षदायी ठरला असून, यामुळे समाजसेवेच्या पुढील कार्यात नवचैतन्य आणि उत्साह निर्माण झाला आहे.

!! सेवा हेच कर्म !!

Diwali Celebration 2024 at Matoshri Vriddhashram
31 October 2024

Diwali Celebration 2024 at Matoshri Vriddhashram

दिवाळी उपक्रम 2024 – पहिला

Matoshri Vriddhashram, Viladghat, Ahilyanagar

सहायोग समर्पण ग्रुप गेल्या ९ वर्षांपासून दिवाळीच्या निमित्ताने दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणणारे उपक्रम राबवत आहे.

या वर्षी मातोश्री वृद्धाश्रम (विळदघाट, अहिल्यानगर) येथे भेट देऊन वृद्ध आजी-आजोबांसोबत दिवाळी साजरी केली. त्यांना किराणा, फळे आणि इतर आवश्यक वस्तू देत त्यांच्या जीवनात थोडासा गोडवा आणण्याचा प्रयत्न केला.

वृद्ध आजी-आजोबांच्या भेटीने आणि त्यांच्या अनुभवांचे विचार ऐकून सर्व सदस्यांना खूप समाधान आणि आनंद वाटले.

!! सेवा हेच कर्म !!

Diwali Celebration 2023 at Matoshri Vriddhashram
13 November 2023

Diwali Celebration 2023 at Matoshri Vriddhashram

दिवाळी उपक्रम 2023

Matoshri Vriddhashram, Viladghat, Ahilyanagar

सहायोग समर्पण ग्रुप गेली ८ वर्षांपासून दिवाळी निमित्त दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण होईल असे कार्यक्रम करत असतो.

या वर्षी सहायोग समर्पण ग्रुपने मातोश्री वृद्धाश्रम (विळदघाट, अहमदनगर) मधील आजी-आजोबांबरोबर दिवाळी साजरी केली. आम्ही त्यांना फराळ, किराणा, वजन काटा, first-aid, फळे आणि इतर सामान दिले.

आम्ही त्यांच्या आयुष्यात दिवाळी निमित्त थोडा गोडवा आणण्याचा प्रयत्न केला याचा सहायोग परिवाराला आनंद आहे. 🙏

!! सेवा हेच कर्म !!