Skip to content

1 November 2026

Balghar Prakalp, Tapovan Road, Ahilyanagar

बालघर प्रकल्पातील अनाथ मुलांबरोबर आनंदमयी दिवाळी!Diwali Celebration 2026 (First Initiative) at Balghar Prakalp

Diwali Celebration 2026 (First Initiative) at Balghar Prakalp

🪔 सहयोग समर्पण सेवा फाउंडेशनतर्फे यंदाची दिवाळी बालघर प्रकल्पातील मुलांसोबत उत्साहात साजरी करण्यात आली. (2026 दिवाळी उपक्रम – पहिला)

या उपक्रमात विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातांनी सुंदर आकाशकंदील तयार केले आणि पणत्यांची सजावट केली. त्यांच्या कलाकृती, चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साहाने दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला. यावेळी विद्यार्थ्यांना मिठाई आणि अत्यावश्यक सामानचे वाटपही करण्यात आले.

यंदाची दिवाळी केवळ सण साजरा करण्यापुरती मर्यादित नव्हती, तर विद्यार्थ्यांसोबत आनंदाचे क्षण निर्माण करण्याची आणि त्यांच्या आनंदातून खरा आनंद अनुभवण्याची होती. ❤️

कारण, दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यातच खरा आनंद दडलेला असतो!

!! सेवा हेच कर्म !!

  • बालघर प्रकल्पातील मुले आकाशकंदील तयार करताना

    Children making lanterns at Balghar Prakalp

  • मुलांनी स्वतःच्या हातांनी तयार केलेले आकाशकंदील

    Handmade lanterns crafted by the children